कारंजा : बहुजन समाजाकरीता, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, इतर मागासवर्गीय समाजाच्या व दिव्यांग बांधवाच्या सुविधेकरीता, महामानवाच्या जयंती स्मृतीदिन कार्यक्रमाकरीता, सांस्कृतिक तथा विविध अशा कार्यक्रमाकरीता स्वतंत्र सभागृह, निवासी वसतीगृहाकरीता व सामाजिक न्याय विभागा अंतर्गत येणार्या इतर कार्यालयाकरीता तसेच सुसज्ज अशा ग्रंथालय, अभ्यासिका व इतर सर्व सोयी सुविधा सभागृहानी युक्त अशा सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीपासून कारंजा शहर वंचित राहिलेले आहे. तरी विद्यमान सरकाराशी समन्वय साधीत जिल्ह्यातील सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्याय भवनाच्या मागणीचा प्रस्ताव तयार करून ही मागणी पूर्ण करून घेणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाकडे व्यक्त केले आहे.