वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दि.15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित, स्वातंत्र्यदिन झेंडावंदन कार्यक्रमास अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार ॲड.किरणरावजी सरनाईक, स्थानिक शाळा समिती संचालक पंजाबरावजी देशमुख,संजय कुमार जिरवणकर,प्राचार्य संजयराव देशमुख,उपप्राचार्य शिरीष माळोदे,उपमुख्याध्यापक संजयराव नरवाडे,पर्यवेक्षक सुशील सोवीतकर,माजी प्राचार्य डॉ.के.बी.देशमुख,सुधाकरराव देशमुख,रिसोड तालुक्यातील माजी सैनिक तसेच लॉन्स क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार यांच्या हस्ते,स्वतंत्रता आंदोलनातील देशभक्तांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण आणि ध्वजस्तंभाचे पूजन करून ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर ध्वजाला सलामी देवून सामुहिक राष्ट्रगीत,राज्यगीत गायन करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला बहुसंख्य गणवेशातील विद्यार्थी विद्यार्थ्यानी शाळेचे प्रांगण, स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाने गजबजून गेले होते. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविण्यात आले आहे .