गोंदिया -जोपर्यंत ओबीसी समाज भारतरत्न डॉ .भीमराव आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधान प्रति जागृत होत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाचा विकास असंभव आहे असे मत माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक /अध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे यांनी पत्रकारांसोबत चर्चा करताना सांगितले .पुढे ते म्हणाले की रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मी आदर्श मानतो .परंतु महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती शाहू महाराज ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय कोणतीही लढाई आपण जिंकू शकत नाही .आज आपण देशाच्या 75 वा सुवर्ण महोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो . परंतु 75 वर्षे होऊन सुद्धा आज ओबीसी समाज त्याचप्रमाणे एससी ,एसटी, मजदूर ,कामगार वर्ग या वर्गाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. चर्चासत्रात मेट्रो टाईम चे मुख्य संपादक विजयकुमार डहाट, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,बापू वार्ता चे संपादक देवेंद्र दमाहे , बसपाचे प्रदेश सचिव शंकर भेंडारकर ,संजय रंगारी उपस्थित होते.