अकोला:-
मतदाराशी समर्पित असलेले नेतृत्व व सर्वसामान्यांच्या संवेदना समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या लोकनेते संजय भाऊ धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाची सुविधांमध्ये त्रास होऊ नये यासाठी इंग्रज काळापासून 120 वर्ष जुने गांधीग्राम पूल पावसामुळे त्याच्या पिल्लर मध्ये कॅप आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम व नॅशनल हायवे या विभागाने वाहतुकीला अपायकारक असल्याची तांत्रिक समितीने अहवाल दिल्यावर ताबडतोब राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून अवघ्या दोन दिवसात अकोट पंचकोशीतील नागरिकांना रेल्वेची सुविधा उपलब्ध करून अकोट अकोला मेमो ट्रेन सुरू केली आणि शेतकऱ्या ंवर अन्याय होता कामा नये गेल्या अनेक बारा वर्षांपासून गोपालखेड या पूर्णा नदीवरील पुलाचे काम थांबले होते 28 शेतकऱ्यांची संवाद साधून शेतकरी व प्रशासन यांना एकत्रित करून तो रस्ता पूर्ण करून गांधीग्राम येथे पर्याय रस्ता दुचाकी आणि पाण्याच्या काळ सोडून वावा यासाठी तातडीने चार कोटी चा रस्ता तयार केला व या पुलाचे सुद्धा रिपेरी करण्यात आली व केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून 99 कोटी रुपये मंजूर करून हा पूल निर्माण केला तसेच गांधीग्राम परिसरात सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे करण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून आणला व त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली. आपले सहकारी आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकले, युवा खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत घेऊन या रस्त्याला गती देण्याचं काम करून कामाला सुरुवात करू जनतेला अभिप्रेत कार्य केले व आज या कामाला पाहणी करून शिवभक्तांना व राजराजेश्वर या एकोणीस किलोमीटर पायी चालणाऱ्या भक्तांना गैरसोय होऊ नये यासाठी सुद्धा एक अत्याधुनिक सुंदर घाट निर्माण करण्याच्या दृष्टीने आदेश दिले व त्या कामाची प्रगती पाहण्यासाठी आज खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांसोबत चांगल्या प्रति काम व्हावे यासाठी सूचना केल्या.
अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील १०० वर्ष पुल क्षतीग्रस्त झाल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती यामुळे अकोला-अकोट मार्गाने प्रवास करण्यासाठी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.पुलावरील वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था गोपलखेड मार्गे करून हा प्रश्न निकाली काढण्यात यश आले. व नागरिकांना आर्थिक ,भुदंड होऊ नये. यासाठी आमदार सावरकर यांनी लोकनेते माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकार्याने केली राज्य केंद्र राज्याकडे पाठपुरावा केला व नामदार देवेंद्र फडणवीस नामदार नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
नागरिकांच्या त्रासाला समजून घेत अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांची भेट घेऊन गांधीग्राम येथील जुना पुल पाडून नवीन पुल निर्माण कार्यासाठी १०० कोटींचा भरीव निधी मंजूर करून आणत नागरिकांची समस्या निकाली काढली व पुलाची उंची वाढवून पावसाळ्यात पूर्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे ही वाहतूक आता बंद होणार नाही याची ही दक्षता घेण्यात येणार आहे.
तसेच अकोल्याचे माजी महापौर विजयजी अग्रवाल आणि जयंतराव मसने यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या कडे कावड व पालखी मोहोत्सवावेळी शिवभक्तांच्या सोई साठी योग्य व्यवस्था करण्यात यावी या करता पाठपुरावा केला त्यामुळे नदीपात्रात शिवभक्तांना उतरण्यासाठी ०८ मीटर रुंदीचा पायऱ्या व विस्तृत घाटाचे निर्माण कार्य ही प्रगती पथावर आहे.यामुळे नदी घाटावर श्रावण महिन्यात शिवभक्त व गणेश विसर्जन आणि दुर्गा देवी विसर्जन वेळी चांगली व्यवस्था उभी राहणार आहे. तसेच अस्थिकलश विसर्जन व दशक्रिया विधी साठी ही योग्य व्यवस्था होणार आहे.
आज खासदार अनुप धोत्रे,आ.रणधीर सावरकर यांनी गांधीग्राम येथे जाऊन पुलाच्या निर्माण कार्याची पाहणी केली व अधिकाऱ्यांशी संवाद साधला व स्थानिक गावकऱ्यांच्या सूचना ऐकून घेत आवश्यक त्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.
आगामी श्रावण महिन्यात कावडधारी व समस्त शिवभक्तांकरता योग्य अशी व्यवस्था ही या पुलाच्या कामाच्या सोबत केली जाणार असल्याने समस्त शिवभक्तांकडून खासदार अनुप धोत्रे आणि आमदर रणधीर सावरकर यांचे आभार मानले जात आहे.
यावेळी खासदार अनुप भाऊ धोत्रे,अकोला पूर्व चे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या समवेत जयंतराव मसने,विजय भाऊ अग्रवाल,मनिराम टाले,विनोद मंगळे,मंगेश घुले,बाळासाहेब धुमाळे,गिरीश कोरडे,मधू पाटकर,ज्ञानेश्वर आडे,किरण ठाकरे,दत्ता भाऊ काडोळे,नंदू राठोड,सरपंच शरद ठाकरे,अतुल आवारे,पवन वर्मा आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....