अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे विश्व योग दिनानिमित्त २१ जून २०२३ रोजी जागतिक कीर्तीच्या योग प्रशिक्षक श्रद्धा दळवी (दुबई )यांचे व्याख्यान संपन्न झाले . सदर कार्यशाळेत प्राणायामाचे महत्त्व ध्यान साधना व योग या विषयावर विस्तृत व्याख्यान श्रद्धा दळवी यांनी प्रस्तुत केले.
आंतरराष्ट्रीय मंचावर योग विषयक दिव्यांगांना कसा रोजगार प्राप्त होऊ शकतो ? आणि योग विषयक विविध अभ्यासक्रम कोणते ? याविषयी साधक बाधक चर्चा व्याख्यानादरम्यान करण्यात आली.जागतिक स्तरावर आयोजित या कार्यशाळेत संपूर्ण विश्वातून दिव्यांग व सर्वसामान्य व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने एका व्यासपीठावर माहितीचे देवाण-घेवाण करीत होते.दिव्यांगांसाठी योग अभ्यासक्रम व आंतरराष्ट्रीय मंचावर प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळवून देण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला विशेष कार्यशाळेचे आयोजन लवकरच करणार असून ज्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी संस्थेचा ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदणी करावी.असे आव्हान संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे यांनी केले आहे . कार्यशाळेचा यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे विजय कोरडे ,अनामिका देशपांडे ,संजय तिडके ,अरविंद देव ,शुभांगी मानकर ,वंदना तेलंग ,भारती शेंडे पूजा गुंटीवार ,अंकुश काळमेघ ,विशाल भोजने ,श्वेता धावडे ,संजय फोकमारे ,मनोज गाडगे व विनोद टिकार यांनी सहकार्य केले .