कारंजा : संपूर्ण कारंजा शहरात बाजारपेठेत,रुग्नालय व महत्वाच्या ठिकाणी महिलाच्या स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही सुविधा नसल्यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांची कुचंबना होत आहे. त्या दृष्टीने,स्थानिक नगर पालिकेने प्रत्येक चौका चौकात आणि महत्वाचे म्हणजे जुना बायपास येथील स्थानिक झॉशी राणी चौकात महिला स्वच्छता गृहाचे निर्माण करण्यात यावे याकरीता, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशालाताई येळणे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदे कडे निवेदन देण्यात येवून लवकरात लवकर स्वच्छता गृहाचे निर्माण करा अन्यथा तिव्र आंदोलनचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देतेवेळी शिवसेना शहर प्रमुख अरुण बिकड, उपशहरप्रमुख वाकोडे, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ हर्षाताई मोटे, महिला वैद्यकीय कक्षप्रमुख सौ. कृपाताई ठाकरे, महिला आघाडी शहर प्रमुख अनिता ताई राऊत, उपशहरप्रमुख सौ सुरेखा ताई खडसे, शिवसैनिक नंदू तोरसे, सतिश कांबळे, अक्षय राऊत, बंटी घुले आदींची उपस्थिती होती . ,