शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था सिंचनाची व्यवस्था व्हावी व शेतकऱ्याची उत्पन्न दुप्पट व्हावे या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना सुरू करण्यात आले तसेच महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना च्या माध्यमातून सुखी समृद्ध ग्राम निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी घ्यावे व यामध्ये आपलं हातभार लावावे अशी आव्हान आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना २०२५
मौजे सुकळी नंदापुर ता.जि. अकोला येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व ग्रामपंचायत भवन चे भूमिपूजन ही करण्यात आले व आरो प्लांट जल शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय संपूर्ण यंत्रणासह सुसज्जित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने मदत केली आहे त्या मदतीच्या माध्यमातून आपली ग्रामपंचायत चांगली करण्याच्या दृष्टीने इमारत त उभारणी करून सुजलाम सुफलाम गाव करण्याच्या दृष्टीने तसेच आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना द्यावा व यामध्ये हातभार लावावे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार सर्वसामान्य न्याय देण्याच्या दृष्टीने अनेक योजना सुरू केली आहे लाडकी बहीण करोडपती दीदी या योजना चा लाभ प्रत्येकाने घ्यावा अशी आमदार सावरकर याप्रसंगी म्हणाले या कार्यक्रमाला गावातील सरपंच गजानन महाराज सारसे गणेश सारसे परमेश्वर साखरे किशोर लोडम देवलाल सारसे नितीन सारसे राजुभाऊ इंगळे साहेबराव इंगळे प्रल्हाद तिडके रतन भाटी सचिन सारसे राधेश्याम सारसे रामेश्वर सारसे दिनकर तिडके विठ्ठल महल्ले ज्ञानेश्वर छबिले सोपान सारसे वैभव सारसे शुभम सारसे मिलिंद इंगळे पुरुषोत्तम झामरे विवेक भरणे नंदकिशोर अरबट नंदू सारखे माधव मानकर अंबादास उमाळे नारायण बोर्डे आधी समवेत होते