सततधार पावसाने जनजीवन विस्कळीत.शाळकरी मुले आणि चाकरमान्यांचे होताहेत हाल..!ढगांचा प्रचंड गडगडाट नी विजाचा कडकडाट राहणार.अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे 15 ऑगष्ट पर्यंत सुर्यदर्शन होणार नाही. -हवामान तज्ञ गोपाल गावंडे
वाशिम/कारंजा/मानोरा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, महाराष्ट्रासह पूर्व व पश्चिम विदर्भात सध्या चोहीकडे सततधार पाऊस सुरु असून,अक्षरश: जनजीवन विस्कळीत झाले आहे.वाशिम जिल्ह्यासह कारंजा मानोरा भागात दिवसरात्र सततधार सुरूच आहे.पावसामुळे शाळकरी मुले आणि चाकरमान्यांचे भयंकर हाल होत असून,पावसामुळे शेतमजूरांची डवरणी-निंदनाची कामे बंद पडलेली आहेत.एकंदरीत सांगायचे म्हणजे विदर्भातील अनेक भागात मानवप्राणी निसर्गापूढे हतबल झाला आहे.या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दुरध्वनीवरून हवामान विशेषज्ञ गोपाल विश्वनाथ गावंडे (रा. रुईगोस्ता ता.मानोरा जि. वाशिम) यांचेशी हवामान अंदाजाविषयी संवाद साधला असता,गोपाल गावंडे यांनी सांगीतले की,आजच्या अंदाजानुसार विदर्भाच्या अनेक भागात दि 22 जुलै ते 06 ऑगष्ट पर्यत ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पाऊस होणार असून,काही भागात विजा पडण्याच्या शक्यतेमुळे प्रचंड हानी होण्याचीही संभावना असू शकते.त्यानंतर दि. 07 ऑगष्ट ते 13 ऑगष्ट पर्यंत मात्र काही भागात पाऊस पडणारच नाही.मात्र सर्वत्र ढगाळ वातावरण राहील. दि.14 ऑगष्ट 15 ऑगष्ट रोजी रिमझिम पाऊस राहिल.तर 16 ऑगष्ट नंतर स्पष्टपणे सुर्यदर्शन होत राहील.असी शक्यता गोपाल गावंडे यांनी वर्तवलेली असून,पावसाचे वृत्त आम्ही शेतकरी,शेतमजूर, गुराखी,शाळकरी मुले आणि नागरिकांच्या सतर्कते करीता देत असतो.एखाद्या वेळी विज पडणार.असे हवामानाचे भाकित असते. (त्यामध्ये लोकांना भयभित करण्याचा हेतू नसतो. तर तो सावधगीरीचा इशारा असतो.) त्याचा उद्देश किंवा अर्थ विज पडलीच पाहीजे.असा होत नसून अशा दुर्घटनेपासून मानवी जिवीताचे संरक्षण व्हावे. असाच आमचा हा प्रामाणिक उद्देश असतो.तरी कृपया नागरिकांनी सतर्क राहून, ढगाचा गडगडाट आणि विजाच्या कडकडाटाचा अंदाज घेऊन दुपारनंतरच गावाबाहेरून किंवा शेतामधून गुराढोरासह आपल्या वसाहतीत परतावे.नदी,नाले,रस्ते,पुल ओलांडत असतांना पाण्याच्या प्रवाहामधून जाऊ नये.आपले वाहन,दुचाक्या,चारचाक्या,बैलगाड्या,गुरेढोरे प्रवाहातून नेऊ नये. सहसा शेतामध्ये विजा हिरव्या झाडावर पडण्याची दाट शक्यता असल्यामुळे,पाण्यापासून बचावाकरीता झाडाखाली आश्रय घेऊ नये.थांबू नये.असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.