प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदानकदा आयुष्यभर ताणतणावच असतो.संसाराचे राहाटगाडगे चालवीतांना प्रत्येकाला नाना संकटाना तोंड द्यावे लागते.परंतु ह्या विविध संकटावर मात करीत,चेहर्यावर नेहमी हास्याचे तेज झळकविणाऱ्या आमचे मित्र नितीन उपाख्य पप्पूसेठ भट यांची गोष्टच वेगळी.स्वतःचा धान्य खरेदी विक्रीचा अडत व्यवसाय सांभाळीत असतांना, आपल्या अनमोल वेळातील वेळ काढून त्यांचे धार्मिक-आध्यात्मिक-सामाजिक कार्य नेहमी सुरु असते. अडी अडचणीत असणाऱ्या मित्रमंडळीच्या संकटात धावून जाण्याचा त्यांना चांगलाच व्यासंग. त्यातून त्यांनी आपल्या सभोवती मित्रमंडळींचे अभेद्य कवचच निर्माण केले आहे. राजकारणी नेत्या पासून तर ग्रामिण भागातील शेतकरी ग्रामस्थ त्यांचे मित्र आहेत. गोंविदराव मुंदेकर आणि पप्पूसेठ भट यांची तर कृष्ण-अर्जुनाची जोडीच प्रसिद्ध आहे.जेथे गोविंदराव मुंदेकर तेथे पप्पूसेठ भट.आणि जेथे पप्पूसेठ भट तेथे गोविंदराव मुंदेकर हे ब्रिदच होऊन गेले आहे. जीवाभावाची मैत्री करून निभविणाऱ्या पप्पूसेठ भट यांनी त्यांच्या मैत्रीने आम्हालाही आपलेसे करून टाकले आहे.मंगळवार दि.21 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या आचंद्र दिवाकरौ लक्ष्य कोटी शुभेच्छा . . !
(शुभेच्छुक : संजय कडोळे,ज्येष्ठ पत्रकार कारंजा [लाड] जि.वाशिम.)