कारंजा (लाड) ( वैशाली चवरे ) : कारंजेकरांकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान महावीर जयंती मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान महावीर जयंतीचा उत्सव दि. ७ ते १० एप्रिलपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. दि.९ एप्रिल रोजी महासमिती महिला मंडळामधील महिलांनी मनभावन मनमोहक असे राजस्थानी नृत्य ( सोळा स्वप्न ) सादर केले होते.महा समितीची स्थापना होऊन पंधरा वर्षे झाली.या महासमिती महिला मंडळामध्ये १३० सदस्या आहेत. त्यामुळे ते संभाग झालेला आहे, दि. १० एप्रिल गुरुवार रोजी, १००८ भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव, शांततेने आणि मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला, भगवान महावीर जन्मोत्सव निमित्ताने १० एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती, या कार्यक्रमांमध्ये कारंजा नगरीमधून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये महिलांनी विविध पोशाख परिधान केलेले होते, 'जिओ और जीने दो' या मंत्राचा जयघोष करण्यात येत होता. प्रारंभी महावीर स्वामीचा अभिषेक व पूजन करण्यात आले.तसेच भव्य दिव्य रथामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली.महासमिती महिला मंडळ संभागाचे अध्यक्ष,सुलभा फुरसुले, सचिव जयश्री चानेकर, महासमितीच्या सदस्या महाराष्ट्र अचल व महामंत्री प्रणिताताई फुरसुले, उपाध्यक्ष अंजलीताई काळे, सहमंत्री शुभांगी फुरसुले, कार्यकारी सदस्य रेखा चुंबळे इत्यादी महिला आहेत. यावेळी सादर करण्यात आलेल्या राजस्थानी नृत्यामध्ये सहभागी महिला श्रद्धा जैन,प्रगती भेलांडे, इशा मांडवगडे,सपना काळे, विशाखा अडाने,प्रियांशी अडाने, पूजा संघई, कु, श्रुती चवरे, वैशाली चवरे, पूजा जोहरापूरकर व गोजिरी गुळकरी इत्यादी सहभागी सर्व महिलांनी सुंदर असे नृत्य सादर केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.असे वृत्त महिला वृत्त प्रतिनिधी वैशाली चवरे यांनी कळवीले.