वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. वाशिम जिल्हा कार्यालय अंतर्गत जिल्हयातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्याकरीता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन 2022-23 या शैक्षणीक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी,पदवी,पदव्युत्तर,वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे,अशा विद्यार्थ्यांना गुण क्रमांकानुसार जिल्हयातील प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अणाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येईल.गरजु विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,रेशन कार्ड,गुणपत्रिका, बोनाफाईड,दोन फोटो,आधारकार्ड आदी कागदपत्रांसह प्रस्ताव 15 जुलै 2023 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,चिखली रोड वाशिम येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन सादर करावा.असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे.एम.गाभणे यांनी केले