वाशिम(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या उमरी-पोहरादेवी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामांचे भुमिपूजन १२ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते संपन्न झाले.
या विकास आराखड्यातील तिर्थक्षेत्र उमरी येथील प्रत्यक्ष कामाच्या पायाभरणीचा कार्यक्रम सामकी माता मंदिर परिसर,उमरी येथे
समाजातील संत-महंताच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थिती राहणार आहे.तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन प्रशासन,महंत यशवंत महाराज व उमरी ग्रामस्थांनी केले आहे.