ब्रम्हपुरी/प्रतिनिधी
नेतेमंडळी आपल्या वाढदिवसानिमित्त जल्लोष करण्यास प्राधान्य देतात, मात्र चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि ब्रम्हपुरी अखिल कुणबी समाज मंडळाचे उपाध्यक्ष मा. प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी समाजहितासाठी विधायक उपक्रम राबवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे._
_*प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमोदभाऊ चिमुरकर मित्र परिवार व R.W. अकॅडमी, ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी सभागृह, ब्रम्हपुरी येथे स्पर्धा परीक्षा व गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला*. या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांचा सन्मान व्हावा आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिशा मिळावी, हा उद्देश ठेवण्यात आला._
_या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य भाऊराव राऊत, गिरीश बुराडे, योगेश मिसार, उमेश धोटे (चौगानचे सरपंच), वकार खान, वासुभाऊ सोंदरकर, अमित कन्नाके, सुहास कटकमवार, सुरज मेश्राम, सुरज तलमले (तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), पत्रकार संतोष पिलारे, होमराज लोनबले, दीपक मेहर, विलास दुपारे, सुधीर शिवरकर ,मनोहर सहारे,सुरज शिवनर,चुनी नागमोती,यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती._
_याप्रसंगी प्रमोदभाऊंच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मोहित गावतुरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, गणराज दोणाडकर द्वितीय तर शालिंद्र ढोक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर राकेश मोहुर्ले, श्याम थाकल, भूषण मेश्राम, शिवानी गुरनुले, रोशन बगमारे, श्रेयस अवळे, छगन वारजुकर, योगिता बावणे, नयन बावणे, भूषण ढोरे, नितेश बावणे या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला._
_कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य भाऊराव राऊत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, आहाराचे महत्त्व आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. तर *प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांच्या जोरावर कोणतेही यश साध्य करता येते. संकटांवर मात करण्याची मानसिकता अंगीकारल्यास जीवनात काहीही अशक्य नाही.” तसेच त्यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मित्रपरिवाराचे मन:पूर्वक आभार मानले.*_
_कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन होमराज लोनबले यांनी केले. याप्रसंगी परिसरातील विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी याचे उत्कृष्ट उदाहरण ठरले._
आपल्या प्रतिक्रिया द्या....