वाशिम : भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांना जयंती निमित्त आज १४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ "राष्ट्रीय बालक दिन" साजरा करण्यात येतो.
सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे यांनी पंडीत नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण केला. यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.