जालना:- भोकरदन- जाफराबाद तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विहिरीच्या कामांना मंजुरी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे च्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे 2014पासून या दोन्ही तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विहिरीच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली नाही तसेच यावर्षी या दोन्ही तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने हे दोन्ही तालुके दुष्काळाच्या झळा सोसत आहे.
तरी या दोन्ही तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विहिरीच्या कामांना तात्काळ मंजुरी देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे योग्य ती कार्यवाही न केल्यास राष्ट्रवादी काँगेस पार्टी च्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, युवानेते सुधाकर अण्णा दानवे, रमेश राठोड, दिलीप पालकर सर यांच्यासह आदी उपस्थित होते.