कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) -- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह अनेक महापुरुषांच्या अहिंसक पद्धतीने केलेल्या आंदोलनाचे फलित म्हणून देश इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त झाला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं हा अलिकडच्या काळातील इतिहास आहे. त्यानिमित्त दरवर्षी 15 ऑगष्ट स्वातंत्र्यांचा वर्धाप दिन म्हणून आपल्या देशात सर्वत्र उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करुन महामानवांना आदरांजली अर्पण केली जाते.
त्या निमित्ताने कारंजा (लाड) शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही स्व. इंदिरा गांधी चौकात कांग्रेसचे निष्ठावान जेष्ठ कार्यकर्ते गाजी रहेमान यांच्या हस्ते झेंडावंदन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक ॲड संदेश जैन जिंतुरकर, माजी नगरसेवक इर्शाद भाई , शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमीर खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष सुभानभाई कामनवाले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष फारुख अली , जफर खान, खेर्डा काळीचे माजी सरपंच प्रदिप वानखडे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
झेंडावंदन संपन्न झाल्यानंतर राष्ट्रध्वज तिरंगा ध्वजाला त्रिवार मानवंदना देऊन राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज कानकिरड यांनी केले.असे वृत्त सेवादल काँग्रेसचे जिल्हा समन्वयक अँड संदेश जिंतुरकर यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाद्वारा पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांना दुरध्वनीवरून कळवीले आहे.