अकोला :-श्री संत गाडगेबाबा व्यायाम शाळा तर्फे स्थानिक प्रभात प्रभात किड्स,वाशिम रोड, अकोला येथे २१ दिवसाचे निवासी मुलांचे कुस्ती प्रशिक्षण शिबीराच्या समारोपा प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून लाभलेले राष्ट्रीय विचार मंच चे संयोजक स्वानंदजी कोंडोलीकर या प्रसंगी बोलतांना म्हणाले , हल्ली टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये लहान लहान मुले घरात बसून मोबाईलवर तासनतास रिल्स बघणे आणि व्हिडिओ गेम्स खेळणे याव्यतिरिक्त अवांतर काही प्रयोग करताना आढळत नाहीत. कुठेतरी मैदानी खेळांपासून आताच्या पिढीची नाळ तुटलेली कुठेतरी जाणवते. पण श्री. राजू गोतमारे यांच्या प्रयत्नाने अशा प्रकारच्या कुस्ती शिबिरांमुळे अकोल्यातील मुलांना या मातीतल्या भारतीय खेळाबद्दल आवड निर्माण होत आहे. बाल वयात आपल्या पारंपरीक खेळाकडे त्यांचा कल वाढेल आणि हेच या शिबिराचे यश होय. यासाठी आयोजक राजुभाऊ गोतमारे निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. कुस्तीपटुंना भविष्यात शासनस्तरावर जी काही शासकीय मदत लागेल त्यासाठीचा पाठपुरावा करतांना राष्ट्रीय विचार मंच आपल्या परीने सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गजाननजी नारे सर यांनी 21 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरादरम्यान सहभागी कुस्तीपटूंना इंग्रजी व्याकरणाचे धडे दररोज दिले . ज्यामुळे सहभागी मुलांमध्ये कुस्ती या खेळाबरोबरच इंग्रजी व्याकरणाचे धडे सुद्धा गिरवता आले .तसेच राष्ट्रीय विचार मंच चे श्री.पंकज सादराणी, रुपेश वाखारकर, श्री. राम भिरड, श्री.अभयसिंग राजपूत, हे व्यासपीठावर उपस्थित होते.