राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, राष्ट्रीय महिला महासंघ ,राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ जिल्हा शाखा तर्फे रविवार दिनांक 27 नोव्हेंबर 2022 ला दादासाहेब कन्नमवार सभागृह , चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नागपूर रोड चंद्रपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव फंड, उद्घाटक काँगेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे होते.
, वक्ते म्हणून राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे प्रवक्ते "भारतीय संविधानतील हक्क व अधिकार व लोकशाहीतील पुढील आव्हाने" या विषयावर रुषभ राऊत यांचे मार्गदर्शन करताना संविधानातील हक्क व अधिकार काय आहे असे सखोल मार्गदर्शन केले व संविधानाचे मूल्य जपा असेही बोलले, तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, हे बोलताना राष्टीय ओबीसी महासंघाच्या कार्यावर प्रकाश टाकला. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष दिनेश चोखारे , भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, महानगरपालिकाचे माजी उपाध्यक्ष राहुल पावडे, माजी नगरसेवक देवानंद वाढई, प्रसिद्ध सर्जन डॉ संजय घाटे, ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल विजय पिदूरकर, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शाम लेडे, कर्मचारी महिला महासंघाच्या रजनी मोरे, सुतार समाजाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा प्रा ज्योती ताई राखुडे उपस्थिती होत्या.

या दरम्यान समाजातील ओबीसीत येणाऱ्या विविध समाजाचेअध्यक्ष , जेष्ठ नागरिक व गुरुदेव सेवा मंडळच्या अध्यक्ष यांना संविधान वाटप करून सत्कार करण्यात आले आणि चंद्रपूर ते शिवनेरी पर्यत ओबीसी जनगणना साठी पैदल गेलेले चेकनिंबाला येथिल अकुश कौरसे व त्यांचे सहकारी यांचा संविधान देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष देवराव दिवसे , संचालन श्रीकृष्ण लोणबले यांनी केले तर आभार रेखा वंजारी तर सहकार्य प्रदीप पावडे, रामदास कामडी, राजू हिवंज ,हरडे सर, गौरकर सर,अशोक मोरे,गणेश आवारी,कवडू लोहकरे, तुळशीदास भुरसे, कवींद्र रोहनकर यांनी केले आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....