दि. 05/05/2025 ला महाराष्ट्र बोर्ड एच.एस. सी. फेब्रुवारी-2025 चा निकाल जाहीर झाला त्यात हितकारिणी उच्च माध्य. विद्यालय आरमोरी येथील विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम आलेल्या कु. श्रुती श्रीहरी प्रधान ला 77.17% घेऊन उत्तीर्ण झाली याबद्दल कौतुक करण्यासाठी व भावी वाटचालीसाठी आरमोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. दिपक देवतळे यांनी गृहभेट देऊन शुभेच्छा दिल्या.
श्रुतीचे वडील श्रीहरी प्रधान हे लोकविद्यालय तळोधी या शाळेत शिपाई या पदावर कार्यरत असून आई सौं कुसुम श्रीहरी प्रधान या गृहिणी आहेत या यशाबद्दल श्रुतीने शिक्षकांना व आई वडिलांना श्रेय दिले आहेत.
गृह भेटी दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख मा. राजेश वडपल्लीवार ,मुख्याध्यापक पंढरे, महात्मा गांधी कन्या विद्यालय आरमोरी गट साधन व्यक्ती कु. करुणा बागेसर, हेमंत बिसेन, कु. गुडपवार, हितकारिणी उच्च माध्य. विद्यालयचे प्रा. संदीप प्रधान, प्रा. रूमदेव सहारे उपस्थित होते.