कारंजा लाड: कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथे गेल्या दोन महीन्या पासून गावठान व शेतीचा विद्यूत पुरवठा विस्कळीत आहे . गावला स्वतंत्र लाईनमन नियुक्त नाही तसेच विद्यूत विषयक तांत्रीक उपययोजना करण्याकरीता अधीकाऱ्यावर जबाबदारी निश्चीत करावी या मागण्याचे निवेदन किसान ब्रिगेड काजळेश्वर शाखा अध्यक्ष तथा सरपंच नितीन पाटील उपाध्ये यांनी उपअभियंता कारंजा महावितरण यांना दि.२५ जून रोजी दिले असून आठवड्याभरात कारंजा महावितरण कार्यालयाने कार्यवाही न केल्यास कार्यालयास ताला ठोको आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे .
वृत्त असे की ग्राम काजळेश्वर येथे दोन महीन्या पासून गावठान व शेतीचा विद्यूत पुरवठा विस्कळीत आहे . त्यामुळे गावचा पाणीपुरवठा नळयोजना प्रभावीत होत आहे तसेच गुरांना पिण्याचे पाणी विद्यूत अभावी हौद नियमीत भरल्या जात नाही . गावला नियमीत कायम स्वरूपी लाईनमन नियुक्त नाही त्यामुळे विज दुरुस्तीचे काम केल्या जात नाही . दिवसेन दिवस विज खंडीत होण्याचे प्रमाण वाढत आहे . गाव अंधारात राहते आहे इत्यादी समस्या उपअभियंता कार्यालयास लेखी व तोंडी स्वरूपात अनेक वेळा केल्या आहे . चार पाच दिवसात करतो असे आश्वासन कार्यालयाकडून मिळते परंतू प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही . गावला स्वतंत्र लाईनमन नसल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान; व्यावसाईक व ग्रामस्थांचे दैनंदीन जीवनात अडचणी येत आहेत तेव्हा कारंजा महावितरणने काजळेश्वर साठी तात्काळ कायम स्वरूपी लाईनमनची नेमणूक करावी; गावठान व शेतीचा विजपुरवठा नियमीत करावा यासाठी समंधीत अधीकारी यांची जबाबदारी निश्चीत करावी अशा आशयाचे निवेदन सरपंच नितीन पाटील उपाध्ये यांनी उपअभीयंता कारंजा महावितरण यांना दि .२५ जून रोजी दिले आहे . आठवड्याभरात महावितरणने कार्यवाही न केल्यास गावकरी महावितरण कार्यालयास ताला ठोको आंदोलन करतील याची जबाबदारी कारंजा महावितरण कार्यालयाची राहील असे निवेदनात म्हटले आहे . याबाबत निवेदनाद्वारा लेखी माहीती खासदार संजय देशमुख ; आमदार सईताई डहाके; आमदार भावना ताई गवळी यांना देण्यात आली आहे .
कोट: दोन महीन्या पासून गावठान व शेतीचा विद्यूत पुरवठा विस्कळीत आहे . गावला स्वतंत्र लाईनमन नाही पावसाळ्याचे दिवस आहे . विद्यूत तांत्रीक बिघाडाने गावकरी अंधारात असतात विद्यूत अभावी गावच्या योजना प्रभावीत आहेत . चारपाच दिवसात कार्यवाही करतो एवढेच उत्तर कार्यालयाकडून मिळते . आठ दिवसात सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर कार्यालयास ताला ठोको आंदोलन गावकरी करतील याची जबाबदारी विद्यूत महावितरणची असेल . असा इशारा नितीन पाटील उपाध्ये
सरपंच ग्रामपंचायत काजळेश्वर यांनी दिल्याचे अशोकराव उपाध्ये यांनी कळवीले आहे