अहेरी तालुक्यातील गोमनी ते आलापल्ली मार्गाने अवैधरीत्या दारूची वाहतूक चारचाकी वाहनातून होणार असल्याच्या माहितीवरून अहेरी पोलिसांनी बोटलाचेरू फाट्यावर पाळत ठेवून चारचाकी वाहनासह ९६ हजार रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. प्रथम सुरेश सांगेल (२२) व अजय कृष्णा खोब्रागडे (२२) दोघेही राहणार विवेकानंदनगर, गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अहेरी तालुक्यातील गोमनी ते आलापल्ली मार्गाने अवैधरीत्या दारूची वाहतूक चारचाकी वाहनातून होणार असल्याच्या माहितीवरून अहेरी पोलिसांनी बोटलाचेरू फाट्यावर पाळत ठेवून केला. चारचाकी वाहनासह ९६ हजार रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.प्रथम सुरेश सांगेल (२२) व अजय कृष्णा खोब्रागडे (२२) दोघेही राहणार विवेकानंदनगर, गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. आलापल्ली येथील चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस शिपाई मंथनवार यांना गोपनीय सूत्रांकडून गोमणी ते आलापल्ली मार्गाने दारूसाठा पुरविणारी गाडी येत असल्याची माहिती मिळाली अटक केली. आलापल्ली येथील चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस शिपाई मंथनवार यांना गोपनीय सूत्रांकडून गोमणी ते आलापल्ली मार्गाने दारूसाठा पुरविणारी गाडी येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार बोटलाचेरूच्या फाट्यावर पंचांसमक्ष पाळत ठेवली.तेव्हा स्विफ्ट डिझायर (एमएच ०२० डब्ल्यू. ए. ७१९२) आली. वाहनात असलेल्या मालाचा पास किंवा परवाना नसल्याचे दिसून आले. तेव्हा पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल जप्त केला.
यात रॉकेट संत्रा देशी दारू कंपनीचे बारा बॉक्स. प्रति बॉक्समधील ९० एमएलच्या मापाचे १०० नग अशी एकूण ९६ हजार रुपयांची दारू तसेच चार लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ४ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (अ), कलम ८३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विजय चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.