कारंजा (लाड) : सर्वधर्मिय समाजाचे नेतृत्व करणारे तथा सहकार नेते सुनिल पाटील धाबेकर यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये भूविकास बँक ; जिल्हा परिषद अकोला इत्यादी अनेक क्षेत्रात यशस्वीरीत्या नेतृत्व केलेले आहे.तसेच वंचित,शोषीत,बहुजन समाजाचा विकासच करायचा तर आधी समाजातील लोकांकरीता उदरनिर्वाहाचे साधनं निर्माण करून त्यांच्या रोजगार निर्मितीची व्यवस्था करायला हवी आहे.हे सत्य त्यांनी जाणलेले आहे.त्यामुळे सर्वात आधी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघामध्ये उच्च शिक्षणाचकरीता व्यावसायिक महाविद्यालये,इंजिनिअरींग कॉलेज आणि एमआयडीसी स्थापन करून लहानमोठी उद्योगधंदे सुरु करण्यासाठी कारखाने आणण्याकडे त्यांचा दृष्टिकोन असणार आहे. त्यामुळे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेद्वारी जाहीर केली.वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी मराठा, कुणबी,ब्राम्हण,धनगर,इतर मागासवर्गीय समाजाला खुल्या दिलाने उमेद्वारी दिली आहे. आज जरी सुनिल पाटील धाबेकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेद्वार असले तरी ते कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे सक्षम नेते आहेत. शिवाय महत्वाचे म्हणजे त्यांची उमेद्वारी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील सकल समाजाचा विकास साधण्याकरीता अत्यावश्यक ठरणारी आहे.या उमेद्वारीमुळे ते सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येणार आहेत.मंत्रालयातील उच्च अधिकारी वर्गाकडून मतदार संघाची विकासात्मक कामे करून घेण्यास ते सक्षम आहेत. त्यांच्या उमेद्वारीमुळे कारंजा मानोरा मतदार संघाचा विकास होऊन कायापालट होणार आहे. असी अपेक्षा माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे त्यांना समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जनतेचे पाठबळ मिळत आहे.असे देखील त्यांनी कळविले असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार प्रदिप वानखडे यांनी कळवीले आहे.