वाशिम : येथून जवळच असलेल्या ग्राम चिवरा येथील बुद्ध विहारात परिसर स्वच्छ मोहीम राबविण्यात आली. त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्ताने, परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाने,ग्राम चिवरा याठिकाणी महिला लोककलावंत व महिला बचत गट यांच्या विद्यमाने बुध्द विहार परिसर स्वच्छ मोहीम यशस्वी करण्यात आली .
यामध्ये सत्वशिलाबाई सरकटे ,चित्रलेखा सरकटे, शोभाबाई सरकटे, पंचफुलाबाई सरकटे , द्वारकाबाई सरकटे, आनंदीबाई सरकटे, सुवर्णा सरकटे, कौसल्याबाई सरकटे, सिंधुबाई सरकटे ,संगीता सरकटे , आशाबाई सरकटे, संगीता सावळे ,माता रमाई बचत गट ,भिमाई बचत गट , सावित्रीबाई बचतगट, एकता महिला बचत गट इत्यादीच्या उपासिका सहभागी झाल्या होत्या.असे शेषराव मेश्राम यांनी कळविले आहे .