ब्रम्हपुरी /
खास गणेश उत्सव काल्या निमित्ताने तालुक्यातील भगवानपुर येथे सार्वजनिक गणेश मंडळ, भगवानपुरच्या वतीने साताऱ्याची गुलछडी डान्स हंगामा या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ब्रम्हपुरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोनुभाऊ नाकतोडे तर सहउद्घाटक म्हणून युवक काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरीचे शहर सचिव वकार खान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सहअध्यक्ष म्हणुन चोरटीच्या सरपंच निशाताई मडावी, तर उपाध्यक्ष म्हणून अमीतभाऊ कन्नाके युवा कॉं.अध्यक्ष ब्रम्हपुरी, सुरजजी मेश्राम युवा कॉं.शहर अध्यक्ष ब्रम्हपुरी,उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून समस्कर साहेब आरओ ब्रम्हपुरी, बोरचाटे वनरक्षक ब्रम्हपुरी, बळांदे वनरक्षक ब्रम्हपुरी, सुधाकर कांबळी उपसरपंच चोरटी, कालेश्वर रामटेके, शालिक नन्नावरे काँग्रेस अध्यक्ष भगवानपुर, दयासिंग भूरानी आदी मान्यवर उपस्थित होते.
"साताऱ्याची गुलछडी" या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये लावणीची खूप जुनी परंपरा आहे.कलेचा आविष्कार लावणी मधून होतो.
छक्कड, जुन्नरी, बलेघाटी, पंढरपुरी, बाजाची असे लावणीचे विविध प्रकार आहेत. लावणीच्या माध्यमातून कला सादर केली जात आहे. गणेशोत्सवामधे कलेला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याचा मला आनंद आहे.
सार्वजनिक गणेश मंडळ, भगवानपुरच्या वतीने साताऱ्याची गुलछडी डान्स हंगामा या सांस्कृतीक कार्यक्रमाचा गावकऱ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक गणेश मंडळ, भगवानपुरच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....