कारंजा (लाड) : नुकत्याच मुंबई येथे ग्रामीण पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व दिव्य अशा कार्यक्रमात,वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा सुप्रसिद्ध समाजसेविका, सौ ज्योतीताई अनिल गणेशपुरे यांना त्यांच्या उत्कृष्ट अशा सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याबाबत अधिक वृत्त असे की,सौ ज्योतीताई अनिल गणेशपुरे ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 22 वर्षापासून कार्यरत आहेत.अगदी समाजाकरता "जीवाचे रान करणाऱ्या रणरागिनी, गोरगरिबांच्या कैवारी गोरगरिबांच्या हाकेला ओ देणाऱ्या समाजसेवीका" म्हणूनही जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक आहे ,राजकारण असो की समाजकारण असो,नेहमी धावून येणाऱ्या ज्योतीताई जिल्ह्यातील महिलांचे असामान्य नेतृत्व आहेत.विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्यांनी केलेल्या सेवावरती कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सह्याद्री देवराई वृक्ष संवर्धन संस्थेचे संस्थापक, ख्यातनाम मराठी,हिंदी व दाक्षिणात्य चित्रपट स्टार,सयाजी शिंदे यांच्या हस्ते "बेस्ट वर्क इन हेल्थ केअर अँड वेलनेस" या क्षेत्रातील "महाराष्ट्र रायजिंग स्टार अवॉर्ड 2024" देऊन सौ ज्योतिताई गणेशपुरे यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नवी मुंबई, नेरूळ येथील फाईव्ह स्टार हॉटेल कोर्टयार्ड मेरिएट येथे २८ जानेवारी रोजी संपन्न झाला. यावेळी रेडिओ जॉकी रिया सेनगुप्ता, गायिका तथा अभिनेत्री दिपाली देसाई, टीव्ही 9 च्या संपादिका निखिला म्हात्रे,दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, दूरदर्शन केंद्र वरळी मुंबईचे माजी संचालक मुकेश शर्मा,दैनिक नवराष्ट्रचे संपादक नरेंद्र कोठारे, न्यूज 18 लोकमतचे न्यूज रीडर तथा मोटिवेशनल स्पीकर विलास बढे,ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, एबीपी माझा चे रिपोर्टर वैभव परब यांच्यासह राज्यभरातील पत्रकार, व्यावसायिक, उद्योजक, आरोग्य व सेवा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सौ ज्योतीताई गणेशपुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याची माहिती ग्रामीण पत्रकार संघाचे मुंबई विभागीय कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
सौ ज्योतीताई गणेशपुरे यांनी समाजसेवेचा वारसा त्यांच्या सासूबाई कडून घेतला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.