अवघ्या काही दिवसातच पावसाळा ऐन तोंडावर येऊन ठेपलेला असतांना, स्थानिक ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या वतीने कोणतीही मान्सूनपूर्व तयारी करण्यात आली नाही, असे दिसून येत आहे. पावसाळ्यात अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेता, नगर परिषद प्रशासनाने आणि सर्व नगरसेवकांनी तत्काळ मान्सूनपूर्व कामाला लागण्याची मागणी, शहरातील युवा समाजसेवक- उदयकुमार पगाडे यांनी केली आहे.
यांनी म्हटले आहे की, शहरातील बहुतांश छोटी मोठी गटारे अद्यापही साफ करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाचा पाणी तिथेच साचून राहील आणि पूर्ण परिसरात तोच दुर्गंधीत पाणी पसरत राहील. तसेच काही विभागातील नाल्या, गटारे आणि रस्ते सुद्धा जलमय होतात, आणि मग चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यामुळे लहान मोठे अपघात होऊ शकतात. म्हणून सर्व नाल्यांची सफाई त्वरित करण्यात यावी, आणि सर्व नाल्यांमध्ये, गटारांमध्ये योग्य प्रकारची जंतुनाशक फवारणी त्वरित करण्यात यावी. कारण, नाल्यांमधील साचलेला दूषित पाणी व तेथील कचऱ्यातील मच्छरांमुळे सामान्य जनतेला डेंग्यू मलेरिया, इतर अन्य मोठमोठ्या रोगांचे सामना करावा लागेल. सोबतच, शहरातील मुख्य रस्त्यांवरील मोठं मोठी झाडे, त्यांच्या वाकलेल्या फांद्या त्वरित कापण्यात याहाव्या. अन्यथा, पावसाच्या वेळेस जोरदार वादळ वाऱ्यात मोठं मोठी झाडे पडून वीजेचे तार तुटणे, संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित होणे, अश्या गोष्टीला सामोरे जाहावे लागेल. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य जनतेवर सुद्धा अचानक झाड कोसळून जीवितहानी होऊ शकते, म्हणून रस्त्यांवरील मोठं मोठ्या झाडांची योग्य विल्हेवाट लावावी. शहरात जिथे जिथे नळ लाईन गेलेली आहे, त्या विभागातील सर्व मुख्य पाईपलाइन सुरळीत तपासून घ्यावे, लिकेज असलेल्या पाईप लाइनला त्वरित दुरुस्त करावे. रस्त्यांवरील काही ठिकाणचे बंद असलेले पथदिवे दुरुस्त करावे, सोबतच शहरातील जनतेला मोफत ब्लिचिंग पावडरचे वाटप त्वरित करण्यात यावे.,अशी मागणी युवा समाजसेवक उदयकुमार पगाडे यांनी केलेली आहे.