अकोला–बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे काल निघालेल्या कॅमेरा दिंडीमध्ये सर्व छायाचित्रकार बांधवांचा ज्या उत्साहाने सहभाग झाला, तो खरोखरच अद्वितीय आणि अविस्मरणीय ठरला. कॅमेऱ्यांच्या झगमगाटातून आपल्या एकतेचा, कलाप्रेमाचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश संपूर्ण शहराला मिळाला.
ही दिंडी केवळ छायाचित्रकारांची मिरवणूक नव्हती, तर ती आपल्या व्यवसायाचा आत्मसन्मान, कलेप्रती निष्ठा आणि मैत्रीभावाचा उत्सव होती. आपण सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या सहभागातून हे स्पष्ट दिसून आले की, खरी ताकद ही संख्येमध्ये नसून एकतेमध्ये असते. आपली एकता हीच आपली सर्वात मोठी भांडवल असून याच एकतेच्या बळावर आपण पुढील काळात आणखी मोठी कामगिरी करू शकतो, हा विश्वास आहे.
सहभाग घेतलेल्या सर्व फोटोग्राफर्सना, ज्येष्ठांना, तरुणांना आणि सहकाऱ्यांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या कलेला नवी उंची मिळवून देण्यासाठी आणि छायाचित्रकारांच्या हक्कांसाठी ही संघटना सदैव कटिबद्ध राहील. आपली साथ, आपला विश्वास आणि आपले योगदान हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. या दिंडीमधून प्रकट झालेला उत्साह आणि एकात्मतेचा भाव असाच कायम राहो, हीच अपेक्षा आहे.
नरेंद्र नायसे
अध्यक्ष, अकोला–बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन