राष्ट्रीय कला मंच वर्धा व सचिन डान्स अँकॅडमी तर्फे आयोजित नृत्य स्पर्धेत वैयक्तिक पातळीवर सहभाग नोंदवत आर.जे. चवरे कॉन्व्हेंट व हायस्कूलची वर्ग सातवीची विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्वरी मोहन मुंदे हिने लोकनृत्य प्रकारात उत्कृष्ट नृत्य सादर करीत तृतीय क्रमांक प्राप्त केलाअसून याच ठिकाणी भरतनाट्यम् प्रकारात वर्ग नववीची विद्यार्थिंनी कु. सिद्धी मनिष मुक्कीरवार हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वर्धा येथे आयोजित केलेल्या नृत्योत्सवात एकूण ९०० स्पर्धॅकांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये ग्रुपनृत्य,सोलो नृत्य सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवत आपली कला सादर केली.
आर.जे. चवरे कॉन्व्हेंट व हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या या यशाचे कारंजा एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ , सचिव, मुख्याध्यापिका व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.