कारंजा तालुका येथील समस्त तेली समाज संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून किरण क्षार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली,तर उपाध्यक्षपदी अतुलभाऊ गुल्हाने,अतुल ढोरे,सचिव पदी सुनील दहापुते,संदीप गढवाले,कोषाध्यक्ष विनय गुल्हाने,सदस्य पदी गजानन झंझाट,प्रशांत बिजवे,किशोर भाऊ पाठे,प्रवीण राठोड अनिल सुडके,बाबुराव सरोदे, सतीश क्षीरसागर,दिपक गोदे,गणेश गुल्हाने यांची निवड करण्यात आली, कारंजा तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये तेली समाज आहे.त्या ठिकाणी संघटना तयार करून समाजाला न्याय मिळून देण्याचे काम हे संघटन करणार आहे.यामध्ये समाजाला एकत्रित करण्याचे काम,समाजातील गोरगरिबाच समस्या,संताजी महाराजांची जयंती,पुण्यतिथी,समाजाती विद्यार्थ्यांचा गुण गौरव,हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मार्गदर्शक असे विविध उपक्रम या संघटने मार्फत राबविला जाणार आहे.