कारंजा :- राज्यातील कापुस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामधे ई-पिक पाहणी ॲप /पोर्टलद्वारे कापुस व सोयाबिनची नोंद केली आहे ही अट शिथिल करून सरसकट तलाठीद्वारे नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याबाबत युवा नेते ॲड.ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी मागणी केली . या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणविस यांनी प्र. स. कृषी यांना निर्देश देत कार्यवाही करण्याचे सांगितले.
दि.२९/०८/२०२४ रोजी मा. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांची भेट घेवुन पत्र देवुन शेतक-यांना तलाठी पेऱ्याचे आधारावर सर्वच शेतकर-यांना शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य देण्यात यावे अशी विनंती केली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस यांनी प्र. स. कृषी यांना कार्यवाहीचे निर्देश दिलेत. यामुळे आता शेतक-यांना तलाठी पेऱ्याचे आधारावर सर्वच शेतकर-यांना अर्थ सहाय्य मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.ॲड. ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय देण्याबाबत शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र.४५/४ ओ दि.२६.७.२०२४ , कृषी व पदुम विभाग शासन निर्णय क्र. विकृयो-२१२२/प्र.क.३६६०४ जे दि. १२ मे २०२२ आणि मा. मुख्य सचिव कार्यालयाची दि. २४ जुलै २०२४ ची टिपणी याचा संदर्भ देत मागणी केली त्याची दखल घेण्यात आली.
सविस्तर असे की, राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबिन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रू.१०,०००/- तर ०.२ हे. पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५०००/- (२ हे. च्या मर्यादेत) अर्थसहाय्यामधील ई-पीक पाहणी ॲप / पोर्टलद्वारे कापुस व सोयाबिन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत अशाच शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मात्र बरेच शेतकऱ्यांनी ॲप पोर्टलवर ई-पिक पेऱ्यांची नोंद केलेली आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांची नोंद झालेली नाही तर बरेच शेतकऱ्यांना ॲप/पोर्टलची पुरेशी ज्ञान नसल्यामुळे ते नोंद करू शकले नाही.तरी अशा शेतक-यांना तलाठी पेऱ्याच्या आधारावर सर्वच शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य देण्यात यावे अशी विनंती मा.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे,ॲड.ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी केली.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले.