अकोला : स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी बु. अकोला येथील हनुमान मंदिरात दिनांक १९/४/२०२३ बुधवारला संध्याकाळी ६ वाजता ग्राम जयंती चे आयोजन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळा, श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंडळ, हनुमान जयंती उत्सव समिती, गजानन महाराज मंदिर सेवा समिती, राजमुद्रा ग्रुप, वारकरी संप्रदाय हरिपाठ मंडळ, निर्भय बनो जन आंदोलन व समस्त जिल्हा परिषद नगर खडकी परिवाराच्या वतीने आयोजित केली आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुका व प्रचार यात्रा अकोला जिल्ह्यात येत असून त्याचे मुक्काम व पादुका पूजन वेळ संध्याकाळी ६ वाजता ,६.३० सामुदायिक प्रार्थना, तसेच रात्री ७ वाजता राष्ट्रीय कीर्तन ह भ प सुशील महाराज वनवे सचिव केंद्रीय प्रचार विभाग गुरुकुज मोझरी यांचे होणार असून या ग्राम जयंती महोत्सवाला पंचकोशीतील नागरिक, महिला, तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लांभ घेण्याची विनंती गजानन जलमकर, अनिल हरणे, आदीं अनेक गुरुदेव भक्तांनी केली आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे समाजसेवक गजानन हरणे यांनी कळवली आहे . .