जसा पोळ्याचा बैल पोळ्याच्या दिवशी सजवला जातो तसे 8 मार्च आला का महिला चा आदर ,भाषणे,सत्कार बापा बापा केवढा देखावा आणि नंतर ??
मला एक प्रश्न आहे भारत स्वातंत्र्य झाला ,पण इथे महिला स्वातंत्र्य आहे का हो??
आज समाजात स्त्री भयमुक्त जीवन जगत आहे का हो??
मग असे जर नाही तर स्त्री स्वातंत्र्याचा हा खोटा बोल बाला कशाला??
आज स्त्री शिकली तरी ती स्वातंत्र्य नाही ,तिला आजही बंदी आहे ,तिला अनेक प्रकारे छळले जात आहे.
धर्माच्या नावावर,जातीच्या नावावर,रूढी ,परंपरा ,अशी अनेक बंधने स्त्रीला आहे.
नहू महिने पोटात गर्भ साठवून ,वाढवते त्यासाठी किती त्रास यातना ती भोगते खरच सांगा एवडी सहनशीलता पुरुषात आहे का??
मग विचार करा ती किती शक्तिशाली आहे.
आज समाजात पुरुष स्त्रियांशी वयक्तिक संबंध ठेवतात पण हेच स्त्री ने जर ठेवले तर तिला नानाप्रकारच्या पदव्या दिल्या जातात?
असे का जर स्त्री पुरुष समानता आहे तर मग इथे का दिसत नाही?
म्हणजे पुरुषांना मैत्रिणी ,असे संबंध मुभा आहे जर स्त्री ने एखाद्या पूरुषाशी मैत्रीचे संबंध ठेवले तर तिला बदचलन म्हटले जाते--!
मग एकदिवसीय महिला सत्कार चा का??हा खोटा दिखावा आहे-
आज अनेक ठिकाणी नव्हे तर घराघरात मुलीला तू मुलगी आहेस लवकर घरी ये असे सांगितले जाते, कुणी मुलाला सांगते का तू लवकर घरी ये,
नाही ना
संविधानात स्त्री पुरुष समानता आहे मग वागण्यात का नाही???
इथे का भेद ?
वंश वाढवण्यास तुम्हाला दिवा लागतो तो म्हणजे मुलगा मला सांगा तुमचे हे दिवे किती उजेड ठेवतात??
आज समाजात वृद्धाश्रम का आहेत तेच दिवे आईवडिलांना घराबाहेर काढतात ना?
यात स्त्री सुद्धा सामील असते.
अनेक मुली आईवडिलांना सांभाळतात.
आज कुठल्याच क्षेत्रांत महिला मागे नाही मग तरी तिला गुलामीच्या बेड्या का??
ज्या सावित्रीबाई नि त्रास ,हाल सहन करून शिकवले तिचा फोटो आज शिकलेक्या स्त्रिया ठेवतात आपल्या घरात,नाही त्या व्यस्त आहेत,मार्गशीर्ष, नवरात्र ,वर व्यस्त ,म्हणजे आज खऱ्या अर्थाने स्त्री सुशिक्षीत झाली नाही. याचे कारण तिला या रुढींमध्ये बंदिस्त केले आहे,हे व्रत उपास तापास तिला समाजाने थोपवले आहेत.
कशी जगेल स्वतंत्र जीवन??
पाळी ज्याने नवीन जन्म घेतला जातो पण आजही त्या स्त्रीला घरात मुक्त वावरू देत नाहीत का??
तो निसर्ग निर्मित आहे ,मग तुम्ही तिला याला हात लावू नको ,जेवण बनवू नको माणसाला पाळीत करून खाऊ घालू नये का तिला बंधने??
आज विज्ञानाने महिला कुठेच मागे नाहीत पण गुलामीच्या बाबतीत त्या मागे आहेतच, याला कारण पुरुष प्रधान पगडा हा तिच्यावर लादला गेला आहे .
आज हेच वास्तव आहे हे कुठेतरी बदलायला हवे.
तुम्ही जातीभेद करताय मग जेव्हा बलात्कार होतो तेव्हा तिची जात बलात्कारी बघतो का,त्या मुलीला ,महिलेला न्याय मिळतो का??
यासाठी सर्व महिला आणि पुरुष दोघांनीही सोबत येऊन ही बंधने तोडली पाहिजे.
स्त्री ही घरासाठी, मुलांसाठी आपलं आयुष्य पणाला लावते, आपले जन्म देणारे आईवडील ,भाऊ ,बहीण सोडून येते ,
मग तिला तुम्ही मुक्त जगू द्या ना.
सर्व दुःख ,कष्ट त्रास ती पोटात ठेवते मग तिची भावना जाण नार कोण?
रचना महिला वर असली पाहिजे कारण एक दिवस आदर नको
शिवीत आई ,बहीण
पदोपदी स्त्री ला बंधने ,आजही देशात ,समाजात स्त्री मुक्त आहे का??
माझे एक म्हणणे आहे जरा तुझ्या ----अशी दिल्यापेक्षा त्या ठिकाणी भाऊ आणि बापाला आना मग कळेल.
सदा महिलेला उंबरठा आहे
मुलांच्या संगोपणाचा ,घरातील कामाचा ,नातेवाईकांना खुश ठेवण्याचा, पतीला खुश ठेवण्याचा,असे असंख्य उंबरठे स्त्री च्या आयुष्यात असतात
तिला स्वेच्छेने तो पार करण्याचे स्वातंत्र्य खरच आहे का??
मी सावित्रीबाई वर निबंध स्पर्धा ठेवली होती विषय हेच होते ना
लग्नानंतर स्त्री चे आडनाव ,नाव बदलले जाते का??
जरा विचार करा पुरुष बदलतो का??
उपवास ,व्रत ,हे स्त्रीला च का
दागिने हे शृंगार आहेत ज्याने स्त्री सुंदर दिसते
मंगळसूत्र स्त्री घालते लग्नाची खूण पुरुषानही काहीतरी घालावं
सर्व बाजूने स्त्री ला स्त्री असण्याची जाणीव करून देतात तू कमजोर आहेस
हे विचार तुमच्या डोक्यात येत नाहीत का मैत्रिणींनो.
आता करा समाजात स्त्री स्त्री ची दुष्मन आहे.
जीचा नवरा वारतो तिला समाजात मानाचे स्थान द्यावे,तिचा नवरा मरतो त्याला ती जबाबदार आहे का?
देशरक्षक ,पोलीस, डॉ.हे आपले कर्तव्य पार करताना शहीद होतात अशा लोकांच्या पत्नीला उलट हळदीकुंकू मध्ये तुम्ही आधी बोलवलं पाहिजे,तिलाही जगण्याचा ,आनंदी राहण्याचा सण ,समारंभात येण्याचा अधिकार आहे , हे कुठंतरी बदललं पाहिजे ,ते आपणच बदलायला हवे.
ही बंधने लादली आहे आपल्यावर यावर विचार करा.
आजही हुंडा मागतात का आयुष्यभर बाप मुलीला वागवतो, शिकवतो लग्न करून देतो वरून त्यालाच हुंडा ,दागिने ,गाडी आशा मागण्या का???
तो बाप आधीच आपल्या कमाई ने मुलीला वाढवतो ,शिकवतो ,आणि लग्नाचा खर्च ही करतो तरी लालसा असणारे त्याला हुंडा,गाडी,सोन मागतात, अहो आधीच तो त्याची आयुष्याची पुंजी तुमच्या स्वाधीन करून त्याला आधीच अश्रूंचा धनी असतो ,वरून त्याला ह्या मागण्या??
जरा त्या बापाच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवून बघा मग कळेल एका बापाची व्यथा.
ह्या रूढी ,मला पटत नाही सर्व महिला नि ठरवावे की हुंडा देणार नाही आणि जो मागेल त्याच्याशी लग्न करणार नाही.
तेव्हा ही मानसिकता बदलेल.
कुठे ना कुठे स्त्री याला जबाबदार आहे तीच हे सोडवत नाही तीच बळी पडते
महिलांनी त्यांची मानसिकता सुधारली पाहिजे, आज तीच या सर्व रूढी मध्ये स्वतःला अडकून ठेवत आहे.
कुठेतरी ही जाचक बंधने यावर विचार करायला हवाय तेव्हाच ह्यापासून महिलांची मुक्तता ,सुटका होऊ शकते
हे कुठेतरी थांबले पाहिजे.
ज्या दिवशी पुरुष शौचालयात महिला सुद्धा जाऊ शकेन त्या दिवशी खरी स्त्री मुक्त होईल.
अनिता देशमुख
नांदुरा(बुलढाणा)
हमू--कल्याण
आपल्या प्रतिक्रिया द्या....