अकोला - स्थानिक नाना मंगलम मंगल कार्यालय येथे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, मोरारजी देसाई योग संस्थान आयुष मंत्रालय भारत सरकार व गुड मॉर्निंग ग्रुप अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये 100 चे वर योग साधकांनी प्रत्यक्ष भाग घेऊन शिबिराचा लाभ घेतला.
योग शिबिरामध्ये इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे कॉर्डिनेटर योगाचार्य डॉ सुभाष लव्हाळे, गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ अशोक ओळंबे,कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने, सौं नंदाताई निचळ, डॉ गजानन धरमकर, विलास आगरकर, श्रीमती लता वानखडे, सौ प्रतिभाताई अवचार यांनी योग संबंधी माहिती देऊन योग साधकांकडून योगाचे प्रात्यक्षिके करून घेतली याप्रसंगी योग 21 जून पुरते सीमित न ठेवता नियमित पणे योगा करावl असे आव्हान उपस्थितांना आपला माणूस डॉ अशोक ओळंबे यांनी केले.
तर गेली 17 वर्षापासून नियमितपणे योग शिबिर कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने घेण्यात येत असल्याचे माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने यांनी सांगितले.
विश्वकर्मा भवन येथे नियमित निशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आव्हlन डॉ सुभाष लव्हाळे यांनी केले.
गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दिनकरराव घोडेराव गजानन गोलाईत अरुण मानकर किशोर वडतकर संतोष काटे दत्ता भुसारी प्रशांत बानोले अड संतोष गोळे डॉ राजेश वर्धेकर यांनी योग शिक्षक व शिक्षिका यांचे स्वागत करून आभार मानले.
कार्यक्रमाला रेवत खाडे, अर्जुन जाधव गोपाल दांडगे विवेक यादगिरे, प्रवीण कदम अड प्रवीण सोनी वसंत जlयदे राजेंद्र जोशी, ललिता तराळे सुनंदा पुरी हरीश गंगावते, गजानन माळी शैलेंद्र सिसोदिया, हिम्मतराव पोहरे महादेव खरसाळे संजय वैद्य , लक्ष्मण मोरे चिकटे काका अनुराग आठवले सुरेश वाडकर मुरलीधर आवटे चंद्रकांत ताठे प्रल्हाद शेळके शरद लवटे प्रकाश कुलट विलास वानखडे भिकाजी भगत अशोक भिलकर मीरा ढोरे निर्मला टेकाडे सुमिती राऊत रजनी पोहरे विजुताई लव्हाळे पंचफुला पाथरीकर शीला मगर किरण वादेकर मनोरमा येवले,रेखा जयस्वाल रामेश्वर राठोड अर्जुन जाधव गोपाळ दांदळे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....