कारंजा : जय भवानी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळ कारंजाचे प्रमुख कार्यवाह संजय महाराज कडोळे हे तेहतिस वर्षापासून दरवर्षी कारंजा येथील मातृशक्ति उपासकांच्या घरोघरी - दारोदारी, स्वतः संबळ वाजवून गोंधळ जागरण करून, जोगवा म्हणजेच भिक्षा मागत असतात. [गोंधळ्यांना दान दिल्याने पितरांचा उद्धार होऊन पितृऋण चुकते होऊन, नवग्रह शांती होऊन यजमानाच्या कमाई उत्पन्नामध्ये वाढ होऊन बरकत मिळत असल्याची श्रध्दा असते.] त्यामुळे संजय महाराज कडोळे हे जनकल्याणाकरीता घरोघरी जोगवा [भिक्षा] मागतात आणि मिळालेल्या अन्न धान्य व दक्षीणेचा उपयोग केव्हाही स्वखर्चाकरीता न करता "सातारा लुटून पुण्याला दान करावे."
त्याप्रमाणे" ते अन्नदान म्हणजेच महाप्रसाद करीत असतात. परंतु अलिकडे त्यांच्या प्रकृती स्वास्थामुळे प्रत्येक मातृशक्ति उपासकांकडे त्यांचे जाणे शक्य होत नाही. आणि यावर्षी त्यांचे कडून कोणतीही वर्गणी गोळा होऊ शकलेली नाही. म्हणून दरवर्षीच्या सर्वच सद्भक्तांना जय भवाणी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळाकडून विनम्र प्रार्थना करण्यात येते की, दरवर्षीच्या परंपरेला खंड पडू न देता सर्व मातृशक्ति उपासकांनी गोंधळी यांना आपल्या यथाशक्तिने दानदक्षिणा देऊन जोगव्याच्या [अन्नदान] महाप्रसादाला हातभार लावावा ही विनंती. [यावर्षी जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ आणि सा करंजमहात्म्य परिवाराकडून घरोघरी गावोगावी श्री कामाक्षा मातेच्या नवरात्र आरती विशेषांकाच्या तीन हजार विशेषांक आणि श्री कामाक्षा मातेच्या, दोन हजार छायाचित्र कॅलेंडरचे वितरण करण्यात आले हे उल्लेखनिय असून सदरहु कलेंडर व विशेषांकाचे प्रकाशन शिक्षक आमदार एड किरणराव सरनाईक यांनी केले होते.] तरी जास्तित जास्त मातृशक्ति उपासकांनी संजय महाराज कडोळे यांच्या जोगवाच्या अन्नदानाला स्वतःहून स्वेच्छेने हातभार लावावा असे आवाहन जय भवानी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील खंडार यांनी केले आहे.