रंगपंचमीच्या दिवशी घरी दारू पिऊन आलेल्या एका पतीने घरी "तु मुझे चिकन बनाके दे" असे म्हणत चिकन बनवण्याचा आग्रह करीत पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत रक्तस्त्राव झाल्याने, तीला उपचारसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेपोलीस स्टेशन चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करुण तापस सुरु आहे. आरोपीला पठाणपुरा वार्ड येथील एका पानठेल्याजवळुन ताब्यात घेऊन अटक करण्यात आलीले आहे.
मद्यप्राशन करून आलेल्या पतीने घराच्या अंगणात येवुन पत्नीला आवाज दिला. त्यावर तिची बहिन घराचे अंगणात आली. "मेरा खाना बन गया है, मै तुझे श्याम को चिकन बनाके दुंगी" असे बोलली. आरोपीने शिवीगाळ करून घरासमोरील अंगणात पडलेल्या लाकडी दांडयाने डोक्याचे मागील बाजुस व डावे हातावर मारहान केली. ती अंगणात खाली पडली व तीचे डोक्यातुन रक्त वाहु लागले. आरोपीतीने "मै तेरेको जान से मार डालता" अशी धमकी दिली. घरचे लोक धावून आल्याने सदर घटनास्थळावरून आरोपी हा पळुन गेला. सदर गुन्हयातील जखमीला जास्त मार लागून रक्तस्त्राव झाल्याने, जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपुर येथे भरती करण्यात आले.