अकोला:-अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम श्री जिल्हा अमरावती अंतर्गत शाखा श्री गुरुदेव सेवा मंडळ मोठी उमरी अकोला यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सायंकाळी सहा वाजता सामूहिक प्रार्थना आणि मौन श्रद्धांजली कार्यक्रम रात्री सात वाजता उपस्थित मान्यवरांच्या स्वागत समारंभात या कार्यक्रमाला लाभलेले हभप श्री अशोक रावजी तावरे महाराज यांनी सामुदायिक प्रार्थना चिंतन आणि सेवा कार्य संघटन शक्ती कार्यकर्त्यांची कार्यप्रणाली आणि ग्रामगीतेतील विविध विषयांचे मार्गदर्शन केले श्री विश्वकर्मा संस्थान मोठी उमरी विश्वस्त अध्यक्ष श्री रामभाऊ यवतकार तसेच वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती मोठी उमरी उपाध्यक्ष श्री हरिदास जी काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली रात्री आठ वाजता श्री जयदेव गुरु मंडळ सेवा भजन मंडळ संयोजक श्री गोपाळराव घाटोळकर आणि संच यांच्या भक्तीमय भजनाचा कार्यक्रम सादर झाला तसेच श्री शुभम वरणकर यांनी अकोला जिल्ह्याच्या पुण्यतिथी उत्सवाची माहिती देत सदर कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी बाबाराव पिसे आयुर्वेद सल्लागार, अजय जागीरदार वृत्त छायाचित्रकार यांचा देखील सन्मान करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ घाटोळकर सर्वश्री सेवा अधिकारी संतोष सोनवणे शालिग्राम ताथूरकर मनोहर नागे अंबादासजी राऊत सुभाषराव दुधाटे शिवाजीराव निंबोकार गजानन वानखडे राजीव रौंदळकर आणि अनंता निंबोकार शैलेश ताथूरकर संजय गेडाम व सर्व गुरुदेव सेवक यांनी कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनंता निंबोकार आणि संजय गेडाम यांनी आभार व्यक्त केले रात्री दहा वाजता राष्ट्रवंदनेने पुण्यतिथी उत्सवाचा समारोप करण्यात आला असे मंडळाचे अध्यक्ष श्री राजूभाऊ घाटोळकर यांनी सांगितले