अकोला - स्थानिक डाबकी रोड आश्रय नगर स्थित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे श्री दत्त जयंती व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दि. 28 ते 5 डिसेंबर 2025 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये नित्यस्वाहाकार, गणेश याग /मनोबोध याग, नित्यस्वाहाकार, गिताई याग, नित्यस्वाहाकार, चंडी याग, नित्यस्वाहाकार, स्वामी याग, नित्यस्वाहाकार, रुद्र याग/ मल्हारी याग, दि. 4 डिसेंबर नित्यस्वाहाकार, बली पूर्णाहुती, दुपारी 12.39 वा. श्री दत्त जन्मोत्सव, दि. 5 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पुजन, देवता विसर्जन व दुपारी 12 ते 5 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष अनिलभाऊ गरड यांनी केले आहे.