वाशिम : शासकीय रक्त केंद्र,जिल्हा रुग्णालय,वाशिमच्या वतीने जिल्ह्यातील सरकारी व खाजगी रुग्णालयांना (सामायीक स्वैच्छिक रक्तदान कार्डवर) मोफत रक्त पुरवठा केला जातो. शासकीय रक्त केंद्राचे वार्षिक रक्त संकलन गरजेपेक्षा कमी प्रमाणात होत आहे. शासकीय रक्त केंद्रामार्फत जिल्हा स्त्री रुग्णालय, वाशिम तसेच सिकलसेल थालासेमिया, हेमोफेलियाग्रस्त मुले, गरोदर माता/भगिनी, अनेमियाग्रस्त व अपघात झालेल्या रुग्णांना व इतर गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाला रक्त पिशव्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. शासकीय रक्तकेंद्र व रक्तघटक विलगीकरण केंद्र, पहिला माळा, जिल्हा रुग्णालय, वाशिम येथे नवीन वर्षाचे औचित्य साधून 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत “भव्य स्वैच्छिक रक्तदार शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करावे. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी केले आहे.