आपल्या जिल्ह्यातील,मानोरा तालुक्यातील ग्राम रुईगोस्ता या छोट्याशा गावखेड्यात राहणारे , हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांचे अदाज बरेचवेळा अचूक ठरत असल्याचा प्रत्यय पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांना बऱ्याच वेळा येत असतो. एखादेवेळी मात्र ढगांची दिशा बदलून भाग बदलतही जातो कारण निसर्गापुढे, पर्यावरण आणि वाऱ्याची दिशा यामुळे त्या अंदाजा मध्ये बदलही होऊ शकतो कारण शेवटी अंदाज हे अंदाजच असतात. परंतु काल दि. १७ जुलै रोजी हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी दिलेले भाकित खरे ठरल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या चाहत्या ग्रामस्थांना आला असेच म्हणावे लागेल.दि.१८ जुलै २०२३ रोजी पुन्हा एक नविन चक्राकार वादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले आहे. तसेच त्यांच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात दमदार पाऊस होत असून, वाशिम जिल्ह्याच्या पंचक्रोशीत जवळ जवळ प्रत्येक तालुक्याच्या ग्रामिण भागात पाऊसाने चांगली हजेरी लावली असून रात्रभर चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
त्यामुळे पूर्व आणि पाश्चिम विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाच्या दमदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यामुळे नदी नाल्यांवर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने, नदीकाठच्या गावातील लोकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचा प्रयत्न करावा.हा इशारा आज दि. १७ जुलै ते १ ऑगष्ट पर्यंत देण्यात येत असून गोंदिया,भंडारा, गडचिरोली, यवतमाळ जिल्हयात अति मुसळधार आणि अकोला अमरावती,वाशिम जिल्ह्यातही काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे वृत्त, रुईगोस्ता ता. मानोरा जि.वाशिम येथील हवामान तज्ञ गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दूरध्वनीवरून,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.त्यामुळे ग्रामिण भागातील शेतकरी,शेतमजूर, गुराखी,मेंढपाळ यांनी सावधगीरी बाळगावी.ढगांचा गडगडाट आणि विजेचा लखलखाट सुरू असतांना,झाडाखाली थांबू नये. आपली जनावरे, दुचाकी,चारचाकी वाहने, बैलगाड्या नदी नाल्याच्या प्रवाहातून काढण्याचा प्रयत्न करू नये.असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.