जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या एकलासपुर शेतशिवारात विहीर खोलीकरणाचं काम सुरू होतं. यावेळी अचानक विहीरीचा काही भाग खचल्यानं ढिगाऱ्या खाली दबुन दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी ४ ते ४.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. या घटनेतील गंभीर जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एकलासपूर येथील गजानन मुळे यांच्या विहिरीच्या खोली करणाचे काम सुरू होते. दरम्यान दुपारी चार ते साडे चार वाजता अचानक विहिरीचा काही भाग खचून ढिगाऱ्या खाली दबून गजानन लाटे आणि प्रभू गवळी या दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेत अख्तर शेख हा मजूर गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विहीर खोलीकरण काम करण्यासाठी पाच ते सहा मजूर होते. यामधील तीन मजूर हे विहिरीच्या आत काम करत होते. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास रिसोड पोलीस करत आहेत.