भद्रावती शहरातील जगन्नाथ बाबा कृषी केंद्रात कृषी विभाग व पोलिसांनी गुरुवारी धाड टाकून एक लाखाचे चोरबीटी बियाणे जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. महेश वांढरे व दीपक हरिदास गेडाम अशी आरोपींची नावे आहेत.
जगन्नाथ बाबा कृषी केंद्रामध्ये कापूस जातीचे बोगस बियाणे विक्रीसाठी ठेवल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली. त्या आधारे जिल्हा गुणवत्ता निरीक्षक कृषी विभाग श्रावण बोढे व भद्रावती पोलिसांनी संयुक्त केंद्रावर धाड टाकली. यात १२९ पाकीट चोरबीटी बियाणे जप्त केले.
ही कारवाई कृषी अधिकारी बोडे, ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुशांत गाडेवार, अरुण झाडे, पंकज ठेंगणे, पी. एस. इंगळे, अनुप आष्टीकर, विश्वनाथ चुधरी, निकेश ठेंगे यांनी केली.