पत्रकार संजय कडोळे यांची भविष्यवाणी ठरली खरी : विरोधक झाले भुईसपाट.
कारंजा (लाड) : स्थानिक प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्था कारंजाच्या पंचवार्षिक निवडणूकीत विद्यमान संचालकाच्या विकास पॅनलचा दणदणीत विजय होऊन, प्रशिक पतसंस्थेवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या विरोधकाचे पॅनल भुईसपाट झाले आहे. याचे श्रेय प्रामाणिक,इमानदार, सच्च्या व नि:स्वार्थी संचालकानी केलेली विकास कामे,आपल्या कर्तव्याची जबाबदारी यशस्वी पणे सांभाळून दररोज १४ ते १५ तास काम करणाऱ्या यशस्वी व्यवस्थापिका सौ.आशाताई राऊत मॅडम यांचे चोख व पारदर्शी प्रशासन.पतसंस्थेने सर्वच क्षेत्रातील,सर्वधर्मीय कारंजेकर नागरीकांकरीता केलेली विकास कामे,तात्काळ कर्जपुरवठा,एटीएम द्वारे रात्रंदिवस पैसे काढण्याची व्यवस्था व क्युआर कोड व्यवस्था,शेतकरी बांधवासाठी सुरु केलेले धान्य गोदाम,शीतगृहे इत्यादी विकास कामांना जाते. उल्लेखनिय म्हणजे दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने या निवडणूकीला एखाद्या विधानसभा निवडणूकी प्रमाणेच महत्व आले होते. आरोप, प्रत्यारोप, अफवांचा बाजार, पसरला होता. शिस्तप्रिय आणि व्यवहारात वेळप्रसंगी कठोर प्रशासनामुळे विकास पॅनलला निवडणूक जड जाणार असल्याचीही खोटी अफवा पसरविण्यात आली होती. मात्र इसवी सन १९८३ पासून पत्रकारीता करणारे आणि अनेक निवडणूकींमध्ये अचूक वार्तापत्र देणारे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी ही निवडणूक सोपी असून विकास पॅनलच्या सर्व उमेद्वाराचा १००% निर्विवाद विजय होणार असल्याची एक महिना अगोदरच भविष्यवाणी केली होती. व दि o७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या निवडणूकीत संजय कडोळे यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. निवडणूकीमध्ये विकास पॅनलचे अध्यक्ष ॲड रवीभाऊ रामटेके, आकाश कऱ्हे, मेघन जुमळे, डॉ.सौ.अनघा उकर्डे, सुनिता उके, पांडूरंग भगत, ओंकार पाढेण, कृष्णराव राऊत, गुलाबराव साटोटे, प्रशांत पाटील काळे यांचा बहुमताने विजय झाला आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये ॲड रवीभाऊ रामटेके यांचे विकास पॅनल विजयी होणार असल्याची चर्चा होती त्यामुळे रात्री निकाल हाती पडताच मतदारांसह कारंजेकरांनी लोकमान्य टिळक चौकात एकच गर्दी केली. फटाक्यांच्या आतिशबाजीत,हार बुके देऊन,पेढे भरवून, डीजे च्या तालावर ठेका धरीत कारंजेकरांनी उमेद्वारांचे आभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. माजी आमदार स्व.प्रकाशदादा डहाके मित्र मंडळ, खासदार संजयभाऊ देशमुख मित्र मंडळ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कारंजाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित संचालकाचे स्वागत केले. जिग्नेश लोढाया,गजानन पाटील कडू, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, सुनिल फुलारी, प्रदिप वानखडे, सुनिल गुंठेवार इत्यादींनी अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापिका सौ आशाताई राऊत यांचे अभिनंदन केले. सदहू स्वागत समारोहाचे छायांकन व वार्तांकन आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी केले.