कारंजा :- आरोग्य विभागामार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शेतकरी प्रशिक्षण केंद्र ( आत्मा) सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिकारी मा.श्रीमती भुवनेश्वरी एस.यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.तसेच विशेष आमंत्रित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. वैभव वाघमारे
हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आरोग्य विभागाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी. एस.ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.
आरोग्य सेवेत उल्लेखनीय कार्य करणार्या कार्यरत परिसेवीकांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार जिल्हा स्तरावर प्रदान करण्यात येतो याअतंर्गत परिसेवीका संवर्गातून प्रथम पुरस्कार उपजिल्हा रुग्णालयाच्या सौ.अर्चना अनुप ठाकरे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी,राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.