कारंजा (लाड) सोमवारी लागलेल्या,बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये जिनवरसा चवरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातून यश दिलीपराव खेडकर या विद्यार्थ्याने 90 % गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तसेच मुलींमधून गौरी विनोद गंद्रे या विद्यार्थिनीने ८९.५०%, आदर्श रवींद्र देशमुख ८७.३३%, प्रसाद किशोर गुगळे ८६.६७% गुण प्राप्त केले आहे. तसेच १२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ३७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच विषयानुसार इंग्रजीमध्ये २४ , मराठी १९, गणित १२ ,भौतिकशास्त्र ९, रसायनशास्त्र १७ ,जीवशास्त्र ६, इलेक्ट्रॉनिक्स १० ,सिविलमध्ये १३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कारंजा एज्युकेशन सोसायटी चे सचिव अमलप्रभ चवरे, जे.सी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भारत हरसुले , आर.जे चवरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चोपडे, पर्यवेक्षक प्रशांत गंधक तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तर्फे विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भावी शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा कळवील्या आहे.