.अशोकराव उपाध्ये) : कारंजा तालुक्यातील,ग्राम काजळेश्वर (उपाध्ये) येथील २० वर्षीय गतिमंद मुलीची दि. ३० मे रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीस दि. ३ जून रोजी अटक करण्यात आली आहे.अरबाज अली वल्द असलम अली २२ वर्ष रा.काजी प्लॉट कामरगाव ता.कारंजा असे आरोपीचे नाव आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की,काजळेश्वर येथील २० वर्षीय माया अनेस कोडापे या गतिमंद मुलीचा मृतदेह दि. ३० मे रोजी खेर्डा बु. ते काजळेश्वर रोडवरील,उमा प्रकल्प पुलाखाली,नग्नावस्थेत आढळून आला होता.याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी शारदा शंकर धुर्वे ३५, रा. काजळेश्वर,ता. कारंजा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.सदर गुन्ह्यातील घटनास्थळ हे काजळेश्वर गावापासून अंदाजे २ कि. मी. अंतरावर असलेल्या,उमा नदीच्या पुलाखालील,पात्रातील असून त्या ठिकाणी कोणतीही लोकांची वस्ती किंवा प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना, पोलीस अधिक्षक अनुज तारे,सा.मा. अपर पोलीस अधिक्षक लता फड , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे व त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण खंडारे तसेच सपोनि रामकृष्ण भाकडे, पोउपनि स्वप्नील चव्हाण, ग्रेड पोउपनि धनराज पवार, पोहेकॉ अमोल मुंदे, पोहेकॉ छोटेबली पप्पुवाले, पोहेकॉ रवि वानखडे, पोहेकॉ सुमित जगताप, पोहेको दिपक ढोबळे, पोहेकॉ रवि नागरे, पोहेकॉ सतिष जाधव, पोका तुषार भोयर, पोकॉ प्रभु जुमडे, पोकॉ अंकुश सोन्नर, चापोकॉ अनिल मुंढे, चामपोकॉ पल्लवी मोटे असे मिळुन घटनेपासुन आजपावेतो अथक प्रयत्न करुन आरोपी विषयी कोणतीही माहीती किंवा तांत्रीक पुरावा नसताना,पारंपारीक कौशल्याचा वापर करुन अवघ्या तिन दिवसाचे आत आरोपी अरबाज अली वल्द असलम अली वय २२ वर्ष रा. काजी प्लाट कामरगाव ता. कारंजा यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्याने माया अनेश कोडापे हिचा दगडाने मारुन खुन केल्याची कबुली दिली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी करीत आहे.गावचे सरपंच नितीन पाटील उपाध्ये; तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्ये; आदिवासी समाज सेवक पं.स. सदस्य रंगराव धुर्वे यांनी काजळेश्वर वासीयांकडून किचकट तपासात यश मिळवून आरोपी जेरबंद केल्या बाबत ठाणेदार प्रवीण खंडारे साहेब व समस्त पोलीस फोर्सचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे