कारंजा : स्थानिक ,विकासमहर्षी बाबासाहेब धाबेकर सभागृहात शनिवारी,दिनांक 8/10/2022 रोजी संयोजक किशोर मानकर मानकर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्याकरीता जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती . होती. महाराष्ट्र शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे ठरविले असून तसे आदेशही निर्गमित केलेले आहेत. या शासनाच्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील ग्रामीण वस्त्या, तांडा, वाड्या व खेड्यापाड्यातील हजारो शाळा बंद होतील. व खाजगीकरणाला प्राधान्य दिल्या जावून खेड्यातील ग्रामीण शेतमजूर, भटक्या, विमुक्त, बहुजन समाजाचे तळागाळातील कमकुवत नागरिक मुलांच्या शिक्षणाबाबत आर्थिक दृष्ट्या नाडल्या जाईल म्हणुन शासनाच्या अन्याय अत्याचाराविरुध्द व्यापक जनजागृती करण्याकरीता व जनआंदोलन उभे करण्याच्या हेतु ही सभा घेण्यात आलेली होती.
या सभेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संयोजन समिती मध्ये निवड करण्यात आली.
जी. प.शाळा वाचविण्यासाठी सामजिक कार्यकर्ते, पत्रकार व शिक्षण प्रेमीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
शिक्षण हा मुलभूत हक्क असल्यामुळे ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरीब वंचिताची मुले शिकून साक्षर व्हावी व त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून आमच्या महापुरुषांनी शिक्षणावर भर देवून शाळा काढल्या पण आज या अविवेकी शासनाने सरकारी म्हणजेच जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात घाट घातला आहे.त्यामुळे गोरगरिबांच्या मुली मुलांवर विपरीत परिणाम होणार आहे शैक्षणिक नियमांची पायमल्ली होणार आहे.मुली,अपंग यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे . आपल्या शिक्षण हक्क कायद्याला हरताळ फासला जाणार आहे .अडाणी अंबानींच्या घश्यात शाळा टाकण्याचा हा कट आहे. मोफत पुस्तक योजना, मोफत गणवेश योजना, मध्यांनभोजन तेथे बंद होणार . मदतनीस बंद होणार . ह्या शाळाव्यवस्थापन समित्या जाणार .मग ज्या गावाला शाळाच नाही तिथे मुली कश्या देणार ?लग्नाअभावी मुले राहणार ? हेच उपस्थित सर्वांचे म्हणणे होते.
कार्यक्रमाची भूमिका किशोर मानकर यांनी मांडलीआणि प्रा अशोक जाधव यांनी प्रास्ताविक केले. हंसराज शेंडे,गजानन अमदाबदकर, माजी अतिरिक्त सचिव राठोड साहेब,दयावान गव्हाणे,श्रीराम डोरले पाटील,गजानन धामणे वाशिम,विजय झुनजारे, पत्रकार संजय कडोळे,बंडू भाऊ इंगोले,राजेश मस्के,गजानन खंदारे रिसोड अविनाश शिरसाठ, एड कुंदन मेश्राम, ॲड. अतिश चौधरी,राम नाखले, बागडे साहेब इत्यादींनी मार्गदर्शन केले.
त्या नंतर संयोजन समितीची निर्मिती करण्यात आली.संयोजन समिती पुढील प्रमाणे:अध्यक्ष हंसराज शेंडे,बाकी सर्व संयोजन समितीचे सन्मानित सदस्य. गजानन अमादाबादकर,डॉ.प्रा. अशोक जाधव,प्रा.दयावान गव्हाणे,बंडुभाऊ इंगोले,दिलीप रोकडे,अतिश चौधरी ,संजय खाडे,पी. एम.भगत,रमेश नाखले,विनायक पदंमगिरवार, पत्रकार संजय कडोळे, गजानन वनारसे,विनोदकुमार गणवीर,आशिष धोंगडे,किरण चौधरी,गजानन घुले यांची एकमताने संयोजन समितीमध्ये निवड करण्यात आली.
या सभेला महेश गजभिये ,राजु मते,अविनाश सिरसाठ श्यामकांत राऊत,ईश्वरदास खंडारे,विजय भड,इरफान बेग मिर्झा, हरेंद्र ठोंबरे , सी.के.कळंबे, राजुभाऊ अवताडे,गणेश कंठाले,उमेश अनासने,आकाश सुरेशराव सवाई,किरण चौधरी,विनोद सुरवाडे,सीताराम भोयर,प्रा.सी.पी. शेकुवाले आदी.उपस्थित होते. हरेंद्र ठोंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. असे वृत्त प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....