शंकरपूर : येथून जवळच असलेल्या कवडशी डाक रस्त्यालगतच्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली. अद्यापही मृतकाची ओळख पटली नाही. मृतकाच्या हातावर प्रेमलाल असे गोंदलेले आहे.डोमा फाट्यावरील भदूजी ठाकरे यांच्या शेताच्या धुऱ्यावरील निंबाच्या झाडाला ब्लॅकेटच्या साह्याने एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना दिसून आला.
याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविले. पुढील तपास शंकरपूर पोलीस चौकीचे ठाणेदार विनोद जांभुळे करीत आहेत. वृत लिहिपर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती. मृतकाचा आंगावर निळा- पिवळा- फिकट गुलाबी रंगाचा लायनिंग व चेक्स असलेला शर्ट, निळा रंगाचा लोअर, गळ्यात व कमरेला ताबिज असलेला काळा धागा, डाव्या हातावर प्रेमलाल असे गोदलेले आहे.