कारंजा (अशोकराव उपाध्ये) : श्री गुरुदेव सेवा मंडळ व महीला भजनी मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून भव्य ग्रामजयंती महोत्सव शांतीनगर कारंजा स्थीत श्रीगुरुदेव सेवाश्रम येथे दि २७ एप्रील रोजी उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राज्य शासन पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य अशोकराव उपाध्ये होते .महोत्सवाचे उदघाटन भाष्करराव भावनगरे यांनी केले . तर प्रमुख वक्ते म्हणून ग्रामगीताचार्य गोपाल काकड तथा गुरुदेव प्रचारक रविभाऊ वार्डेकर तथा प्रमुख उपस्थीतीत प्रा अनुप नांदगावकर; माजी जीप सदस्य गजानन अमदाबादकर; आयोजक सुनीलभाऊ दशमुखे; विजय खंडार यांची व्यासपीठावर उपस्थीती होती . प्रथम राष्ट्रसंताचे प्रतीमेचे पुजन हारार्पन व दिप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अशोकराव उपाध्ये यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून आयोजकांनी सत्कार केला . व्यासपीठावरील मान्यवराचाही सन्मान श्रीगुरुदेव सेवामंडळाकडून करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे प्रमुख सुनील दशमुखे यांनी केले . प्रासंगीक मार्गदर्शन प्रा अनुप नांदगावकर व गजानन अमदाबादकर यांनी उपस्थीत गुरुदेव प्रेमीना केले . राष्ट्रसंताची ग्रामगीता या विषयावर रविभाऊ वार्डेकर यांनी तर आदर्श ग्राम व्यवस्था या विषयावर ग्रामगीताचार्य गोपाल काकड यांनी विस्तृत विवेचन केले . राष्ट्रसंतानी सामूहीक प्रार्थना सामूहीक ध्यान या बाबीला विशेष महत्व दिले असून राष्ट्रवंदनेतून राष्ट्रभक्ती वाढीस लागत असल्याचे मत अध्यक्ष स्थानाहून बोलतांना माजी प्राचार्य अशोकराव उपाध्ये यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचलन पंजाबराव बाकल यांनी तर आभार प्रदर्शन संतोषदादा केळकर यांनी केले . ग्राम महोत्सवाचे निमीत्ताने दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल होती . ग्रामगीतेच्या ४१ व्या अध्यायाचे सामूहीक पठन गुरुदेव प्रेमींनी केले . संध्याकाळी विशाल सामुदायीक प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर चिंतन शिबीर संपन्न झाले . सकाळी ब्रम्ह मुर्हूता पासून तर रात्री ११ वाजे पर्यन्त भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले . गुरुदेव महीला भजनी मंडळ शांतीनगर; महालक्ष्मी महीला भजनी मंडळ वाल्मीक नगर; संत मीराबाई महीला भजनी मंडळ लक्ष्मी नगर; गुरुमाऊली महीला भजनी मंडळ बाबरे कॉलनी; गजानन महीला भजनी मंडळ सुंदर वाटीका कारंजा यांनी उत्कृष्ठ भजनाचे सादरीकरण केले . रात्रीला अष्टविनायक पुरुष भजनी मंडळाने राष्ट्रसंताची भजने गाऊन कार्यक्रमात रंगत वाढविली . राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली . कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विजय खंडार; संतोषदादा केळकर; सिमाताई सातपुते; छायाताई गावंडे; छायाताई तुरुक; प्रमीलाताई देशमुख; नामदेव मोखाडे; निळकंठ काळे; पंजाबराव बाकल; मोहन लकडे; सौ ज्योती ताई उगले; हभप अश्वीनी रस्तकर ; संजूभाऊ ताथोड; बाळू पाटील दूर्गे; तृप्ती येळने; अरुणाताई देशमुख; आनंदराव गादे; निळकंठ घुले; संजय कडोळे; प्रदीप वानखडे; गोपाल महाराज ठिलोरकर; आशाताई ताठे; लिलाबाई ठाकुलकर विमलताई बाबरे सौ.किरण वर्मा गणेश पाटील काळे चंदाताई आगरकर विठ्ठलराव काळे हरीनारायण ताठे प्रमिलाताई अंबाळकर; अरुण सालोडकर दादा .; विनोदराव धोटे यांचेसह समस्त गुरुदेव प्रेमीनी योगदान दिले . सर्वाचे आभार आयोजन समितीचे प्रमुख सुनील भाऊ दशमुखे यांनी मानलेत .