तालुका हा डोंगराळ व आदिवासी बहुल तालुका आहे या तालुक्यातील गोर गरीब विदयार्थ्यांना ही क्रीडा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या खेळामध्ये आपल्या देशाचा व राष्ट्राचा नाव लौकिक करण्याची संधी या तालुक्यातील विदयार्थ्यांना मिळाली पाहिजे म्हणून जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी क्रीडा मंत्री मा. श्री. संजय बनसोडे साहेब यांना दिला व तालुक्यातील पेद्दाआसापूर येथील जि. प. प्राथमिक शाळेत खुले जिमचे साहित्य मिळवून द्या अशी मागणी केली या शाळेत एकूण 1 ते 5 वर्ग असून एकूण पटसंख्या 35 आहे ही शाळा आदिवासी डोंगराळ नक्षलग्रस्त भागात असून येथील मुलांना व्यायामाचे महत्व कळावे व्यायामाची नियमित सवय लागावी आमच्या शाळेतील मुलांचा भविष्य क्रीडासोबत उत्तम कामगिरी करावी यासाठी आमची मागणी पूर्ण करून या चिमुकल्या विद्यार्थ्यांना जिमचे व खेळाचे सामान मंजूर करून द्यावे अशी मागणी सुदाम राठोड यांनी क्रीडा मंत्र्यांना केली