संपूर्ण भारतातील पहिल्या ऐतिहासिक अशा कृषी उत्पन्न बाजार समितीचा अभेद्य गड लोकशाही मार्गाने,आपल्याकडे राखीत, कारंजाच्या राजकीय मैदानातील नवख्या वाटणाऱ्या सईताई डहाके यांनी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूकीत असलेले, राजकारणातील मुरब्बी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी तसेच सहकार नेते सुनिल धाबेकर यांना चांगलीच मात दिल्याचे काल रविवार दि ३० एप्रिल २०२३ रोजी,उशीरा रात्री हाथी आलेल्या बाजार समिती निकालावरून स्पष्ट झाले आहे. सदर निवडणूकीत डहाके गटाने आपल्या गटाच्या अठरापैकी अठरा जागांवर विजय मिळवीला आहे.या निकालामुळे डहाके गटाचे प्रचंड ऐक्य आणि आपल्या नेतृत्वावर मतदारांचा प्रचंड विश्वास स्पष्ट झाला आहे.
असेच ऐक्य व रणनिती डहाके गटाने कायम ठेवली तर आगामी नगर पालिका निवडणूकीत सुद्धा डहाके गटाचा झेंडा नगर पालिकेवर फडकणार असल्याची चर्चा या निमित्ताने नागरिकांमध्ये होत असून कारंजा नगरीचे विकासमहर्षी स्व.प्रकाशदादाचा वारसा सईताई डहाके ह्या पुढे नेऊ शकतात हे त्यांचे नेतृत्वाने स्पष्ट झाले असल्याने कारंजाच्या पहिल्या भावी महिला आमदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिल्या जात आहे.